मराठी साहित्याबद्दलचे हे मराठी विक्रेत्याचे आवडते इंग्रजी वाक्य !
बऱ्याचदा कानावरून गेलेय हे वाक्य !
पण एखादे पुस्तक मिळवायचेच हा ध्यास असल्यास ते कुठेतरी सापडतेच हा अनुभव मी गाठी बांधला आहे. दुर्मिळ पुस्तके आपापसांत वाटून घेता येतील.
मनोगता सारख्या संकेतस्थळाचा व आपण सर्वच साहित्याशी जोडले गेलो असल्याचा हा एक अनोखा फायदा होऊ शकेल.
जी दुर्मिळ पुस्तके उपलब्ध नाहीत त्यांची यादी मी मिळवण्यास तयार आहे ती मनोगतावर प्रकाशितही करता येईल. साहित्यप्रेमींनी त्यापैकी कुठली पुस्तके स्वतःजवळ किंवा आसपासच्या वाचनालयांत उपलब्ध होऊ शकतील हे कळवल्यास जुन्या मराठी साहित्याची देवाण घेवाण आरामात करता येईल असे मला वाटते.