पंडितजींनी आव्हान दिले गिरगाव चौपाटीवर जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले. ते आव्हान मुंबईतील मराठी माणसाने स्वीकारले. सभा उधळण्याचे ठरले. चौपाटीवर जाण्याचे सर्व मार्ग पोलिसांनी नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या हजारो कार्यकर्त्यांनी रोखून धरले. तरीही सायरन वाजवत पंडितजींनी गाडी आली आणि वातावरण तापले. पोलिसांना देखील जमाव आवरता आला नाही.त्याचवेळी वाडीलाल पांचाळ नावाच्या गुरहस्तानि आपल्या खाजगी रिव्हॉलवर मधून गोळीबार केला आणि त्या गर्दीतील घाडीगावकर नावाचा कार्यकर्ता हुतात्मा झाला.

महाराष्ट्राला जी मुंबई मिळाली ती चांदीच्या ताटातील आहेर म्हणून मिळाली नाही.त्यासाठी शहरातील मराठी लोकांनी प्राणपणाने झुंज दिली होती आणि अखेर पंडितजींनी शरणागती पत्करली आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.

२९ एप्रिल नवशक्ति - प्रमोद नवलकर.

टीप : कोणाला शक्य असल्यास २९ एप्रिलचा नवशक्ति पेपरातील प्रमोद नवलकरांचे आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वच लेख वाचा.