मुंज हा विधी म्हणून त्या नावाखाली उधळपट्टी करणारे निंदनीयच आहेत, पण मुंज  हा एक संस्कार आहे आणि तो हिंदू १६ संस्कारांतला एक महत्त्वाचा संस्कार आहे म्हणून तो केला पाहीजे हेच जर मान्य नसेल तर या सगळ्या चर्चेला अर्थ नाही. ही एकांगी चर्चा होईल. (मुंज कशी बंद करावी हा एकच मुद्दा होईल)

संस्कारांचे महत्त्व सर्वांना पटले आहे.  काही जण जुन्या पद्ध्तीने (मुंजी सारख्या) करतील तर काहीजण नवीन पद्धतीने (म्हणजे काहीच न करता पुस्तके वाचुन, चर्चा करून वगैरे) करतील. यातील कोणती चांगली आणि कोणती बरोबर हे काळच ठरवेल. संस्कारांचा प्रभाव हा कालांतराने, कसोटीच्या वेळी , धैर्याच्या वेळी लक्षात येतो. आपल्यापैकी ९९% लोकांना हे कसोटीचे क्षण अनुभवायलासुद्धा मिळणाऱ नाहीत. सामान्य जीवनात त्यामुळेच याचे महत्त्व कळत नाही.  पण हे संस्कार ही एक पूर्वतयारी म्हणून जर त्याकडे बघितले तर अश्या प्रकारच्या चर्चा करायची वेळ येणार नाही.

मात्र या संस्कारांसाठी वायफ्ळ खर्च करणे हे अगदी चुकीचेच आहे या बद्दल दुमत नाही.  

बाकीचे चर्चेच्या नावाखाली मांडले गेलेले मुद्दे हे फक्त सामान्य जीवनावरील आधारीत अनुभवांवर असल्यामुळे त्यावर भाष्य न करणे  उत्तम !!

प्रसाद.