आपण या प्रश्नाकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पहावे. हल्ली जनरेशन गॅप इतकी वाढलेली आहे की अनेक गोष्टीत दोन पिढ्यांच्या आवडीनिवडीत फरक पडतो. तेंव्हा ज्यांना आर्थिक दृष्ट्या शक्य आहे त्यांनी आधीपासूनच वेगळं रहाण्यात शहाणपणा आहे. नंतर कटुता वाढल्यावर वेगळं झालं तर संबंध आणखीनच बिघडतात. ज्या मुलाचे आपल्या आईवडिलांवर खरे प्रेम आहे तो वेगळं राहूनही त्यांची काळजी घेईलच. सून सुद्धा लांब राहूनच जास्त गोड वागेल. हे फक्त धडधाकट पालकांच्या बाबतीत लिहिले आहे. आजारी वा परावलंबी पालकांची काळजी मुलगा व सुनेने घेतलीच पाहिजे. त्याबद्दल दुमत असण्याचा प्रश्नच नाही. ती ही घेतली नाही तर त्या बिचाऱ्यांकडे वृद्धाश्रमाशिवाय काय पर्याय आहे ?
हे सर्व अतिशय कठोर वाटेल, पण सध्याच्या काळात ही वस्तुस्थिती आहे. भावना या एकतर्फी असून काही उपयोग नाही.