मला तुमचे म्हणणे मनापासून पटले. इतके चांगले विचार आजकाल वाचायला मिळत नाहीत.

आईवडिल फार लाड करून ठेवतात ना मुलींचे म्हणून मुली ही असली थेरं करतात.  काही  उपाय सुचतात बघा पटले तर,

पहिली गोष्ट मुलींना जन्मच देऊ नका. गर्भलिंग परीक्षा आणि भ्रूणहत्या यांना परवानगी द्या म्हणून एक आंदोलनही सुरु करता येईल. अशाने मुलींची पैदासच होणार नाही आणि हे असले गंभीर प्रश्न उभेच राहणार नाहीत. पैदास झालीच तर त्यांना शिक्षण देऊच नका. उगीच शिकतात बिकतात आणि मग त्यांना मोठ्ठे मोठ्ठे विचार करायची दुर्बुद्धी होते, पण हे झाले भविष्यातील उद्योग.

आता करायचे झाले तर असेही करता येईल,  मुलांना शक्य असल्यास त्यांनी एकापेक्षा अधिक मुलींशी (म्हणजे मिळाल्यातर) लग्न करावे म्हणजे एखादी असा प्रकार करू लागली तर तिला द्या हाकलून, राहिलेली/ ल्या येतील वठणीवर आणि नाहीच आल्या वठणीवर तर नवरा, सासू, सासरे आहेतच, त्यांनी तिला अगदी मुलीप्रमाणे वागणूक द्यावी म्हणजे काय ना की आईने एक थप्पड लगावून दिली तर मुलांना फारसे काही वाटत नाही म्हणे, सुनेनेही आपल्याला आईच थप्पड मारते आहे असे समजून काही वाटून घ्यायचे नाही.

एखाद्याला बहीण वगैरे असलीच तर "तिला तुझे लग्न झाले की तू आम्हाला मेलीस. तुझे सासर हेच तुझे घर, तुझा स्वर्ग हा तुझा नवरा, सासू, सासरा यांच्या पायाशीच आहे. जेव्हा तुझी तिरडी तिथून उठेल तेव्हाच तुला तिथून निघता येईल." असे रोज सांगावे. तिच्यावर त्याचा परिणाम नक्कीच होईल.

बघा, दुसऱ्या कोणी नाही तरी हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. चांगल्या कामाला सुरुवात स्वतःपासून करावी.