मानसोपचारतज्ज्ञांचा मुद्दा तर राहूनच गेला. त्याबद्दल खरंच माफ करा.

माझ्यासकट सर्वच मुलींना मानसोपचारतज्ज्ञांची नितांत गरज आहे. त्याहीपेक्षा एखाद्या चाबूक घेऊन फिरणाऱ्याची गरज आहे. म्हणजे बोलली मुलगी काही(ही) की द्या फटके. उठता लाथा बसता बुक्के मारावेत. मानसोपचारतज्ज्ञ काय करणार - सगळ्या मुलींना एकदम शॉक ट्रिटमेंटच द्या.

आणि मुलींनी सहन करण्याचा प्रश्नच कोठे येतो? नाही कशा सहन करणार? घाला की लाथा त्यांना येतील वठणीवर, उपाशीही ठेवा जर हट्टीपणा करत असतील तर आणि हे काय भलतचं तुलसी, पार्वती यांच्यासारख्या आदर्श सुनांची उदाहरणे दाखवण्यासाठी सर्व सास-बहु मालिका त्यांना मुद्दाम पहायला लावा.

आणि काय हो निर्लज्ज पुरुषांची जात.. मुली बघा लग्न केलं की आई वडिलांपासून मनाने दूर जात नाहीत आणि पुरुष पहा कसे लगेच वेगळे राहायला लागले की दूर बीर जातात.