हे सर्व बघताना त्रास होतो.
केवाका : जनरेशन गॅपसाठी मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडीलांनी लागणाऱ्या गरजा पुरवल्यात ना आपल्याला मग कशाला त्यांना सोडायचं.
: नंतर कटुता वाढल्यावर वेगळं झालं तर संबंध आणखीनच बिघडतात.
पण येणाऱ्या प्रेयसीला किंवा बायकोला आपल्या आईवडीलांपासून त्रास होणार नाही याची खात्री मुलाला नको. त्यासाठी मुलीच्या मागणीला सुरवातीलाच हो म्हणणं ?
: ज्या मुलाचे आपल्या आईवडीलांवर खरे प्रेम आहे तो वेगळं राहूनही त्यांची काळजी घेईलच.सून सुद्धा लांब राहूनच जास्त गोड वागेल.
फक्त दाखवण्यासाठी कशाला खटाटोप.आईवडील आजारी व परावलंबी होण्याची वाट बघायची.हा शेजार धर्म सुधा वाटतो त्यासाठी रक्ताच नात वेगळं असावं अशी अपेक्षा.
भावना या एकतर्फी असून काही उपयोग नाही. : या लिहिण्यामुळे माझे विचारच संपतात.
ती फ़ुलराणी
: यात नेमके काय गैर आहे? उद्या मुलीने म्हटले, की तिच्या आईवडीलाची जबाबदारी तुम्ही घ्यावी, तर आहे तुमची तयारी?
तुम्ही हे चुकीच्या मुलाला विचारत आहात किंवा तुम्ही माझा लेख नीट वाचला नाहीत. माझ्या घरी माझ्या आजीचे उदाहरण आहे. तिच दुःख: बघतो म्हणून मन हळहळत. जवाबदारी टाळावी हे माझ्या घरच्यांनी तरी मला दाखवलं नाही.
: मग अशा परिस्थितीत मुलीने सासूसासऱ्यांची जबाबदारी घ्यावी ही अपेक्षा अथवा सक्ती कशी करता येईल? हे कितीसे रास्त आहे?>>>
सक्ती नाही पण जवाबदारिची जाणीव तरी हवी.वेगळं राहण्यापेक्षा एकत्र राहून पण हा प्रश्न सुटणार नाही. बाजूवाल्याचं उदा दिल आहे. त्यासाठी माणुसकीची एक जाणीव हवी.
त्यासाठी मुला मुलींनी जवाबदारी घ्यावी. जिथे लग्न करून मुलीने स्वतःच्या आईवडीलांना सोडायचं आणि मुलाने बायकोसाठी स्वतःच्या आईवडीलांना सोडायचं आणि दोघांनी वरच्यावर आपआपल्या आईवडीलांची चौकशी करावी पटत नाही.
माणुसकी हरवली आहे का ?