याच विषयाशी मिळती-जुळती चर्चा मनोगत वर झाल्याचे आठवते जमलं तर वाचा तुमच्या प्रश्नाची अनेक उतरे मिळतील.
आणि काय हरकत आहे वेगळं राहण्यात? वेगळं राहील म्हणजे आई-वडिलांची पर्वा नाही हे म्हणणं चुकीच वाटत. वेगळं राहूनही त्यांना गरज असली की त्यांची काळजी घेणारे मुलगा आणि सून मी पाहिले आहेत आणि एकत्र राहून त्यांची विशेष पर्वा न करणारा मुलगा आणि सून हे देखिल दिसतात.
आई वडिलांनी एवढं कष्ट करून वाढवलं त्यासाठी एका मुलीच्या ईछे साठी आपल्या आई वडिलांना सोडून दुसरं घर मांडायचं याची खरंच आवश्यकात आहे का ?
मुलीचे आई-वडीलही कष्ट करूनच त्यांना वाढवतात मग त्याबाबत काय म्हणायचं? तुमच्या वाक्याचा दोन्ही बाजूने विचार केला तर वेगळं राहणं हा योग्य विचार वाटतो ... म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघही आपआपल्या आई-वडिलांपासून (जे दोघांना कष्ट करून वाढवतात ते)वेगळे राहतील .
आणि लग्नाआधीच जर भविष्यात सासू-सुनेच पटणार नाही अशी चिह्न दिसत असतील तर वेळीच वेगळं राहून मनस्ताप टाळणं शहाणपण नाही का? आणि अश्या परिस्थितीत प्रत्येक वेळी फक्त सूनच चूक असते अस नाही तेव्हा या बाबतीत नवीन येणाऱ्या मुलीलाच चूक ठरवणं योग्य नाही.
आणि अजून एक असाही विचार करता येईल .. जेव्हा मुलं वेगळी होतात तेव्हा आई-वडिलांनाही त्यांच्या जवाबदारीतुन मोकळी मिळते. आयुष्यभर आपल्या मुलांसाठी जगताना त्यांनी त्याच्या आवडी निवडी बाजूला ठेवलेल्या असतात त्या ते पूर्णं करू शकतात मोकळेपणाने आपलं आयुष्य जगू शकतात.
एकूण पाहता वेगळे राहणे हे काही पाप नाही आणि फक्त मुलीलाच दोष देणे योग्य नाही.