खरंतर मी माझ्या आई-बाबांना आजी-आजोबांची गेले २० वर्षे सेवा करताना पाहीले आहे आणि माझे आजोबा मला खूपच प्रिय होते. (गेल्याच वर्षी त्यांअं निधन झालं) आणि मला पूर्णपणे कल्पना आहे की घरात मोठ्या माणसांच्या वास्तवाने किती फरक पडतो ते.  मी माझ्या आईला आजोबांची माझ्या काकांपेक्षाही जास्त काळजी घेताना पाहीले आहे. मग तुम्ही अशा मुलांना काय म्हणाल जे २० किलोमीटर वर राहून आई-बाबांसाठी २-२ वर्षे फोन करत नाहीत की भेटायला येत नाहीत? आणि माणूस गेल्यावर मात्र वाटणीसाठी हजर.... असल्या स्वार्थी मुलांबाबत आपलं काय मत आहे हं?????

पण मला असं वाटतं की काळाप्रमाणे माणसाने वागावे.

१.या सगळ्यात सुनेला मुलाच्या आई बद्दल जिव्हाळा नसला तरी चालेल पण मुलाला तर आहे ना त्याने का आपल्या आई वडिलांना सोडायचं ?

आजकाल सासू-सुनेचच काय मुलाचं आणि आई-बाबांचंही पटत नाही असं होऊ शकतं. जर स्वत: मुलाची ही कथा तर सुनेची काय गोष्ट?

२.प्रेयसी किंवा बायकोच्या तडजोडीसाठी आपल्या आई वडिलांशी तडजोड करावी का ? 

आणि कुठलाही संसार दोघांनी होतो, आणि त्यासाठी मुलगी स्वत:चे घर सोडूण येतेच ना? (आता ती रीतच आहे असं म्हटलं तरी) तसंच मुलानेही संसारासाठी म्हणून हा निर्णय घेतला तर काय बिघडलं?शेवटी जबाबदारी ही मुलाचीच असते, आई-बाबा आणि बायको यात ताळमेळ साधायची.अगदी वेगळे राहिल्यावरही नियमितपणे आई-बाबांची काळजी घेण्याचा प्रयत्न ते करु शकतात.  आता ते त्यांना जमत नाही तर कोण काय करणार? मी स्वत: कितीही कामात असले तरी घरी फोन करून आईबाबांशी बोलतेच, तर मग एकाच गावात रहात असतील मुले तर त्यांनी स्वतःच खबरदारी घेतली पाहीजे की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाही.

३.या मुली मुलाच्या आईला आपली आई मानूच शकत नाही का ? 

मी विचार करत होते की किती लोकांनी आपल्या सासूबद्दल जोकस मेल केले असतील. अरे, दूर राहणार्या सासूबद्दल मुलांना काहीच प्रेम नसतं किंवा ते खोटं दाखवण्याचा प्रयत्नही करत नाहीत तर मग मुली वेगळ्या का? मी तर कित्येक लोकांना पाहिलं आहे जे बायकोला माहेरीही पाठवत नाहीत का तर यांना आवडत नाही किंवा यांची कामे आडून राहतात. मग?

४.यावर आताच्या मुली फक्त पटणार नाही म्हणून वेगळं राहण्याची मागणी मुलाकडे करतात ते इतकं कस कठिण आहे ते मला कळत नाही. सासूचे ते टोमणे आणि आपल्या स्वतःच्या आईच बोलणं म्हणजे उपदेश असच काही आहे का ?

सासूचाच काय आई-बाबांचाही उपदेश पटत नाही काही लोकांना. किती लोकांचं आपल्या कंपनीत मालकाशी,साहेबाशी पटतं आणि किती लोक त्याचा उपदेश गोड मानून घेतात? माणसाचा स्वभावच आहे तो, प्रयत्न करायला हरकत नाही पण म्हणून कुणी आयुष्य काढू शकत नाही. इच्छेविरुद्ध जगण्यासाठी आयुष्य खूप मोठं आहे आणि मनातल्या गोष्टी न करता वाया घालवण्यासाठी खूप छोटं.

-अनामिका.