धर्माचे मूळ तत्त्व बंधुत्त्व, समाजातील सर्व घतकामध्ये सामंजस्य. परंतु, धर्माचे ज्ञान नसलेल्या परंतु, त्याचा आव आणणाऱ्या धर्ममार्तंडानी स्वार्थापायी रुढी, रीतीरिवाज, परंपरा, पूजाअर्चा, वगैरे म्हणजेच धर्म हे लोकांच्या मनावर ठसवले. महर्षी व्यासानी सांगितल्याप्रमाणे 'परोपकराय पुण्याय' हाच धर्मनियम आहे. समर्थ रामदास स्वामीनी म्हटले आहे 'समर्थाचिया सेवका वक्रदृष्टी पाहे, असा भूमंडळी कोण आहे।' या मध्ये 'समर्थ' म्हणजे रामदासस्वामी नव्हेत तर सर्वशक्तीमान परमेश्वर. परमेश्वराची सेवा म्हणजे 'परोपकार' परोपकार केल्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो.

आपण मी दिलेली कडी उघडून पहावी. त्या मध्ये थोड्या विस्तारावे पाहता येईल.