माझ्या मते, हा निर्णय मुलांवर आणि त्यांच्या आईबापांवर सोडावा.

ज्यांना लेखकाप्रमाणे मुले (आणि सुना) असतील त्या आईबापांनी मुलाच्या लग्नानंतर मुलगा सुनेसोबत रहावे. ज्यांना काही प्रतिसाददात्यांसारख्या सुना किंवा मुले असतील त्यांनी स्वतःहून वेगळे राहिलेले बरे नाहीतर परिणाम अतिशय दूरगामी आणि वाईट होऊ शकतात. अशा आईवडिलांनी आपण आपल्या मुलांची जी काळजी घेतली त्यापेक्षा स्वतःचीच अधिक काळजी घेतली असती तर बरे, असा विचारही मनात आणू नये, कारण आता उशीर झालेला आहे.

जर आपण मुलगा व सून ह्यांना वेगळी entity मानले, आणि माझ्यामते जे अतिशय योग्य आहे, आणि मूळ लेखकांप्रमाणे अशा entity ला आपण आपल्या पालकांचे काही देणे लागतो असे वाटत असेल, तर मुलगा आणि त्याची पत्नी ह्या दोघांच्याही पालकांची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे. मुलीने आपलं घर पूर्णपणे विसरून जाण्याचे दिवस पाठी पडले आहेत असे वाटते.