या सनातन आणि पुरातन प्रश्नावर सुचवले जाणारे तोडगे हे परिस्थिती/स्वभाव/मुलाचे/सुनेचे/सासूसासऱ्यांचे व्यक्तीमत्व आणि सवयी याप्रमाणे प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत. (अवांतर: या अशा विषयांवर आतापर्यंत सर्व झालेल्या चर्चांच्या प्रस्तावनेत 'माझ्या मित्राकडची घटना/आमच्या परिचितांकडची घटना' हा सावध पवित्रा का असतो? दुसऱ्यांच्या प्रश्नांवर ऊंटावरुन बसून सल्ले देणे सोपे आणि स्वतःच्या घरचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडून मिळणारे सल्ले ऐकणे कठीण, म्हणून की काय?)