आणि लेख वाचून छान वाटले, पण असे सांगावेसे वाटते की डोंगरयात्रा अथवा ट्रेक यांबद्दल काहीही लिहीत असशील तर गावांची नावे, जायचे यायचे मार्ग सविस्तर लिहिले तर वाचकाला मजाही येते नवीनं जागी जायचे असल्यास माहितीही छान मिळते.
इथली थोडी माहिती वाढवत आहे - लोणावळ्यावरून सहारा लेक सिटी कडे जाताना डावीकडे कोराई अथवा कोरी गड लागतो, पुढे उजवीकडे भांबवणे गावाकडे एक रस्ता जातो, या रस्त्याने थोडे ( साधारण १० किमी) पुढे गेले की घुसळखांब गाव लागते. येथून अजून एक रस्ता फुटतो. उजवीकडे गेल्यास तैलबैला, घनगड नवरा-नवरी व नंतर मुळशीला जाता येते. या फाट्यावर डावीकडे वळल्यास आपल्याला, तुंग, जांभळी येथे जाता येते.
पाळंदे याच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे येथेच (घुसळखांब फाट्याजवळ) मोरगिरी नावाचा टेहळणी किल्ला आहे. पण मोरगिरी आणि जांभळी एकच आहे की नाही हे मात्र मला माहीत नाही.
चिकू