मला वाटते की लेखकाने एकतर्फी विचार मांडले आहेत. मुलगा वेगळा राहायला लागला तर त्यांत फक्त सुनेचीच चुक असते का? मुळात मुलांच्या आई- वडिलांची जबाबदारी मुलांचीच आणी त्याला बहीण असली तरी तिने फक्त स्वतःच्या बाळनतपणा पुरता त्यांचा उपयोग करायचा? आणी सुनेचे आई-वडील कधी आले की त्यांना मात्र ऐकवून दाखवायचं, "आम्ही मुलीच्या घरी राहतं नाही हो कधी, आमच्यात पद्धत नाही तशी..." किंवा ९-८ जॉब करणाऱ्या मुलीने घरी आल्यावर स्वयंपाक करावा आणी मुलाने तिला काही मदत केली तर तू दमला आहेस रे , तू नको काम करू.. अश्या सासू -सासऱ्यानं बरोबर हि त्या मुलीने तडजोड केलीच पाहिजे..

नाही तर तुमच्या सारखे लोक असतातच नावं ठेवायला तयार.. मुली स्वार्थी असतात वगैरे म्हणायला...

कोणालाही दोष देण्या पूर्वी ४ दा विचार करावा , कारण प्रत्येकच दुःख वेगळं असतं... आणि ते एकच मापात नाही तोलता येत... काही ठिकाणी काही मुलींचं चुकतंही असेल.. पण सत्य परिस्तिति माहीत झाल्या शिवाय कुठे बोलू नये अस (फक्त) माझं मत आहे.