हो हा लेख एकतर्फीच आहे कारण भावनिक आहे त्यामुळे सध्याच्या युगात आईवडीलांची आपल्याल्या फारशी गरज नाही त्यामुळे कुठले हि कारण देऊन त्यांच्या पासून वेगळं राहता येत. एकत्र राहिल्यावर मुलगा तरी आईवडीलांना विचारत होता त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी पुष्कळ वेळ होता एका मुलीच्या हट्टा साठी ते हि गमवून बसला तर विचारणार कोण आईवडीलांना.आईवडीलांना नको आहेत का मुलं का लग्नानंतर मुला मुलींना नको आहेत आईवडील.त्यांच्या मनाचा विचार करून हे पाउलं उचलायचं का समाजाची गरज म्हणून. अस असेल तर आपल्या आईवडीलांनी का इतकी वर्ष आपल्या मनाचा विचार करून हव्या त्या गोष्टी का दिल्या तेव्हा हि व्यावहारिक विचार केला पाहिजे होता. निदान ज्या घरात एक मुलगा एक मुलगी असे दोन जण असतात त्या घरी मुलीचं लग्न झालं की मुलगा सांभाळायचा आपल्या आईवडीलांना आता ते हि बघण्यास नाही मिळाल तर उपयोग काय.

                 लेखात मुलींबद्दल जास्त लिहिलं गेलं कारण माझ्या कंपूतल्या मुलींची अपेक्षा ( हट्ट ) आहे वेगळं राहणाऱ्या मुलाबरोबर लग्न करण्याची. माझ्या मित्राला वेगळं राहायचा आहे प्रेयसीच्या हट्टामुळे. माझी आजी ( आईची आई ) आमच्या बरोबर राहते कारण तिनं मामां पैकी एक हि मामा तिची जवाबदारी घेत नाही. ५ वर्षात एक हि दिवस आजीची जवाबदारी घेण्याची वेळ आली तर तारांबळ उडते कधी स्वईच्छेने आपल्या घरी एक दिवस घेऊन नाही गेले. दोन्ही सुनेची बाळंतपणाच्या वेळी माझ्या आजीनेच मदत केली.एकत्र असताना ( गरज असताना ) सर्व जवाबदारी आईवडीलांनी उचलायची मग एकदा गरज संपली का मग जमलं तर महिन्यातून एकदा खुशाली कळवायची किंवा विचारायची. याउलट हे सर्व लिहिण्याचा कहर म्हणजे बाजूला एकत्र कुटुंब राहतात सासू चक्कर येऊन जिन्यावर पडते तरी सून बघायला जात नाही आणि काम करणाऱ्या मुलीला पाठवते का तर ती जेवण करत होती.

मी मुलींनाच नाही मुलांनाही दोष दिला आहे पण एकत्र राहण्यासाठी आणि जवाबदारी संभाळायसाठी माणुसकी हवी मग ती मुलांमध्ये हवी आणि मुलींमध्ये ही हवी. पण ती कुठून आणणार. आईवडीलांना वेगळं करण्याची फ़्येशन आहे मग ती कुठल्या ही कारणासाठी खपवायची.

माझ्या लिहिण्याचा उद्देश फक्त आईवडीलाची जवाबदारी मुलाने मनापासून घ्यावी तसं नाही झालं तर ते दुःख बघतोय. हो पण त्या बद्दल आईवडीलांची कुठली हि तक्रार ऐकायला नाही मिळणार कारण मुलाच नसलं तरी आईच प्रेम शेवटी.