:  व भ्रष्टाचार प्रत्येकाला हवा आहे. म्हणजे स्वतःला पाहिजे ते कसेही मिळाले तर चालेल. इतऱानी वाक्ड्या मार्गाने मिळवले तरच तो भ्रष्टाचार!

वरील वाक्य मला योग्य वाटत नाही. भ्रष्टाचारी लोकांनी एक साखळी तयार केली आहे. ती सामान्य माणूस तोडू शकत नाही. फार तर तो स्वतः पैसे खाणार नाही. पण देण्याचे म्हणाल तर त्याबाबतीत तो असहाय्य असतो. नाही दिले तर कधीकधी वर्षानुवर्षे काम होत नाही आणि ते परवडण्यासारखे नसते. या देशांत अजुन बरीच प्रामाणिक माणसे आहेत, पण त्यांची गळचेपी झाली आहे. सामान्य माणसाला त्याच्या रोजीरोटीत पद्धतशीररीत्या इतके गुंतवून ठेवले आहे की एकत्र येऊन लढा वगैरे देण्यासाठी कुठून सुरवात करायची हेच त्याला समजत नाही. त्यासाठीच एका चांगल्या नेत्याची जरुर आहे. एखाद्या पिढीने संपूर्णपणे यात झोकून देण्याची आवश्यकता आहे.