सचिनजी, उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद. पण काही प्रश्न अनुत्तरीत आहेत:
१. हे जे काही होत आहे, ते फक्त विदर्भातच का? मराठवाडा सोडून देवू, कोकण तर जास्त मागासलेला आहे, विदर्भापेक्षा? का आपल्या मते महाराष्ट्रात विदर्भ सर्वात मागसलेला आहे? तसेच अश्या घटना महाराष्ट्र सोडून इतर कुठे होतांना दिसत नाहीत, असे मला वाटते, (कदाचित येथे मी चुकत असेन). हे जर बरोबर असेल, तर असे तिथे काय व्ह्यवयाला लागले एकाएकी?
२. शून्य टक्के कर्जे सरकारने फक्त शेतकऱ्यांनाच का द्यावीत? उद्या शहरी माणसेही अशीच मागणी करू लागली तर? (माणसे काही खेड्यापाड्यातच कर्जबाजारी होतात, असे नव्हे).