प्रा. रा. वि. सोवनींवरून आठवण झाली, ती ह्या संस्थेची. टि. आय. एफ़. आर. चा विभाग असलेली ही संस्था सत्तरीच्या पूर्वार्धात कार्यरत झाली तेव्हा प्रा. वि. गो. कुळकर्णी तिचे प्रमुख होते. तिथे प्रा. लागू, प्रा. सोवनी अशी विज्ञानक्षेत्रातली दिग्गज मंडळी त्यांच्या बरोबर काम करत. विज्ञानाचे शिक्षण मातृभाषेतून कसे सहजगत्या देता येईल, हा ह्या संस्थेपुढच्या अनेक कार्यक्रमांपैकी एक प्रमुख कार्यक्रम होता. त्याचाच भाग म्हणून त्यांनी जळगावजवळ खिरोद्याला एका शाळेत काही प्रयोग चालवले होते. तसेच काही पाठ्यपुस्तकेही त्यांनी मराठीतून (सोप्या, शासकीय नव्हे) काढली होती.
ऐशीच्या दशकात ठाण्यातली काही तरूण, उत्साही मंडळी 'कणाद विज्ञान प्रतिष्ठान' ह्या संस्थेतर्फे मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, ह्या हेतूने प्रेरित होऊन काम करत. त्यांचे त्यावेळी म.टा.मध्ये सोप्या, कुणालाही सहज समजेल अशा भाषेतले लेख मला अजूनही आठवतात.
एक चांगला लेख इथे उर्धृत केल्याबद्दल धन्यवाद, विकि.