काही दोस्तांच्या घरी ही परिस्थिती मी अनुभवली आहे मग ती माझ्या घरी का नाही असू शकणार? का नाही मी झगडू अशी परिस्थिती निर्माण करायला?.. बस्स हाच विचार तर असतो सदैव मनात जो मला नवी उमेद देतो जेव्हाजेव्हा मला माझ्या या विचारांवर संदेह निर्माण होतो. त्यामुळे खरंच अशीच गोड स्वप्ने पडतात मला जी एक ना एक दिवस खचितच सत्यात उतरवण्याची धमक आहे माझ्यात.
आता या मोहमयी स्वप्नातले घर प्रत्यक्षात विकत घेण्यासाठीचे जीवतोड प्रयत्न करतेय.. कारण सद्ध्यातर मी माझ्याच आईबाबांसोबत रहात नाहीये नोकरीनिमित्ताने बाहेर असल्याने.
असो. अशी परिस्थितीनिर्मित चॅलेंजेस मला आवडतात जिथे माझ्याच आईबाबांचा सहवास जिंकायचाय मला..
- वेदश्री.