तुम्ही सर्वांनी नवरा बायको वेगळे राहण्याचे फायदे खूप छान लिहिले आहे.पण माझ्या बहिणीने लग्ना अगोदर माझ्या आईवडीलांना आणि मला कर्ज काढून मोठं घर घेऊन दिल.तेव्हा मी १८ वर्षाचा होतो पण आता माझं कर्तव्य आहे ते चालवण्याच आणि त्या पलीकडे माझ्या आईवडीलांना भरपूर काही देण्याच कारण मला भरपूर मिळाल आहे त्यांच्याकडून यात माझ्या प्रेयसीची किंवा बायकोची जवाबदारी पडते म्हणून वेगळं घर घेणं किंवा वेगळं संसार थाटणं निदान मला तरी नाही पटणार निदान माझ्या प्रेयसीचा तरी तसा हट्ट नाही.
मला वाटत एक घर घेण्यामागे १० लाख ते ४५ लाख पर्यंत खर्च तर येतोच त्यापेक्षा त्या खर्चात आपल्या आईवडीलांना आणि बायकोला खूश ठेवता येईल. असो हा खर्च केल्यानंतर आपल्या बायकोला रोज खूश ठेवतोच ना यात आठवड्यातून एकदा मुला मुली दोघांनी आपआपल्या आईवडीलांना काही दिल तर कुठे बिघडलं. पण तसं होत नाही आपण आपल्या पुरतेच राहतो आपलं जग बायको आणि मुलगा आणि गरज पडले तर किंवा सणासुदीच्या दिवशी आईवडील अस होऊन जात याची खंत वाटते.
सखि अगोदर झालेल्या चर्चेचा दुवा मला मिळेल का ? तुम्हा सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद खूपश्या प्रश्नाच उत्तर तुमच्या कडून मिळाल दिसण्यापेक्षा वेगळं जग दाखवण्यासाठी सुद्धा धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादातून एक प्रश्न पडतो वेगळं राहूनही नवरा बायको सासू सुनेला खूप चांगलं राहता येत पण आईवडीलांच काय त्यांच्या मुला मुलींकडून काही अपेक्षा असतील त्याच काय.यावरून मुलाने किंवा मुलीने लग्न करण्या अगोदर किंवा लग्न केल्यानंतर हि वेगळं राहून हि आपआपल्या आईवडीलांच्या अपेक्षा पूर्णं केल्या तरी त्यांना मानसिक समाधान मिळेल. यात गरज असताना मदत करण वेगळ आणि त्यांच्या अपेक्षा पुर्ण करण वेगळ यात फ़रक आहे अस वाटत.