अहो हे फक्त मुलींबद्दल चाललंय असा गैरसमज का करून घेता. मुलंही तेवढीच जबाबदार आहेत, असंच लेखकाने म्हटलंय. मी तर म्हणेन मुलांचाच जास्त दोष आहे कारण कितीही म्हटलं तरी सुनेला सासूसासऱ्यांबद्दल खूप माया असेल असं गृहीत धरणं चुकीचं आहे. तिचा सहवास काही महिन्यांचा किंवा वर्षांचा असणार, पण मुलगा तर जन्मापासून त्यांच्याबरोबर राहतो ना? त्यानेच अशा सूचनांना विरोध केला पाहिजे. त्यामुळे सुनेपेक्षा दोष मुलाचाच जास्त आहे, असे वाटते.