निनाद, आई वडीलांच्या अपेक्षा म्हणजे तुम्हांला नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही. आपल्या मुलाचा/मुलीचा संसार सुखाचा व्हावा अशीच प्रत्येक आईवडीलांची इच्छा असते. मुलाने व सुनेने सासु-सासऱ्यांची काळजी घेणे हे वेगळे राहूनही करता येते असे मला वाटते. तुम्हांला जे अपेक्षित आहे ते यांपुढील पिढ्यांमध्ये बघायला मिळणे दुर्मिळ होत जाईल . आम्ही आमच्या सासू-सासऱ्यांबरोबर रहातो,त्यांची सेवा करतो,आम्हांला त्यांत आनंदही मिळतो पण आमचा मुलगा (यांपुढील पिढी) कायम आमच्याबरोबरच राहील याची खात्री देता येणार नाही. किंबहुना ९९% एकत्र राहणार नाही असे वाटते आणि त्यात काहीही चूक आहे असे व्यक्तिशः मला वाटत नाही.कारणे काहीही असोत पण काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी बदलत जातात आणि त्या स्विकारण्यांत नक्की चूक काय आहे?