मराठी भाषेतुन विज्ञान(भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,जिवशास्त्र,गणित) यावर पुस्तके निघत नाही .उदाहरणानुसार सांगायचे झाल्यास ईयत्ता १२वी विज्ञान शाखेतील एकाही  पुस्तकाचा मराठी भाषेतुन अनुवाद उपलब्ध नाही.असे का? इंजिनिअरींमधील एकही पुस्तके मराठी भाषेत भेटत नाही आणी उपलब्ध होत नाही ही मराठी भाषेची शोकांतीका म्हणायची का? मराठी भाषेत विज्ञान शाखेतील पुस्तके का येत नाही ते कळत नाही. मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने विज्ञानावर लेखमाला दै‌. सकाळ,लोकसत्तात उपलब्ध होते.पण त्या लेखमालेत सर्व माहीती मिळत नाही. आणी महत्वाची गोष्ट म्हणजे  विज्ञानावर पुस्तके मागावयास अथवा प्रदर्शानांमध्ये पहावयास गेल्यास अंतराळ आणी संगणकावरील पुस्तके दिसतात. भौतिक,रसायन,जिव,गणित या विषयांची पुस्तके अथवा संकेतस्थळ उपलब्ध नाही आहे काय म्हणायचे.

आपला

कॉ.विकि