१. हे जे काही होत आहे, ते फक्त विदर्भातच का? यापेक्षा ते "विदर्भातच घडते आहे" हे महत्त्वाचे आहे. आता तुमची मागासलेपणाची व्याखा मला कळालि तर बरे होईल. त्यानुसार कोकण, मराठवाडा व विदर्भ यात कोण तुमच्या मताप्रंमाणे मागासलेले आहे ते ठरविणे सोपे जाईल.

२. शहरांची आर्थिक स्थिति खेड्यांपेक्षा नक्किच चांगली आहे, आणि तसं नसते तर शहरं दररोज अशी "फुगत" चालली नसती, यात तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमचे २ वर्षापुर्वीचे शहर आणि आजचे शहर यात जरा तुलना करुन पहा. तुमची कर्जे घर, गाडी, यांसाठी असतिल, शेतकर्यांची कर्जे जगण्यासाठि असतात..