मनोगत च्या प्रशासकान्नी नुकतेच माझा एक सबंध लेख डिलीट केलेला असल्यामुळे मी दुःखात होतो. तेव्हा हा जिव्हाळ्याचा विषय सापडला....\
मित्रांनो मी नूतन मराठी या अद्वितीय शाळेत होतो आणि अनेक कारणांमुळे माझा या तीनही शाळांबरोबर बराच संबंध आला. आणि भौगोलिक दृष्ट्या मी या सगळ्या शाळंच्या सगळ्यात जवळ होतो. त्यामुळे मी या विषयात प्रमाण आहे अस समजा....शेवटि काय इकडून तिकडून माणूस सारखाच असा भिडस्त ऍप्रोच सोडून दिल्यास असे म्हणता येईल : हुजूरपागेतल्या मुली खरोखर शिष्ट असतात आणि स्वतःला लय भारी समजतात. त्याचं कारण ह्या शाळेतलं भारी मुलींचं प्रमाण जरा जास्त असतं.. रेणुका मधल्या मुली सरळ आणि गरीब असतात....किंवा आपण असम म्हणू त्या तशा वाटतात. क्वचित त्याही मुली सॉलिड खमक्या होतात हेही मान्य करावं लागेल. पण क्वचित...अहिल्यादेवी हा प्रकार त्या मानाने समजायला बराच सोपा आहे. त्या म्हणजे डेंजरही नसतात, नेभळटही नसतात, फ़ार किचकट ही नसतात......थोडक्यात त्या नॉर्मल असतात असं म्हणायला हरकत नाही...