आपल्या मुलाचा/मुलीचा संसार सुखाचा व्हावा अशीच प्रत्येक आईवडीलांची इच्छा असते.सहमत पण ती फुलराणी आणि आईवडीलांच कर्तव्य आणि मुलाच मुलीचं आईवडीलांसाठी काही कर्तव्य आहे यालाच मी आईवडलांच्या अपेक्षा म्हणतोय.
त्या पेक्षा मुला मुलींचे कर्तव्य काय आहे त्या बद्दल लिहितो.
१.मुलाच्या संसारात जो हक्क त्याच्या बायकोला आणि मुलाला ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्या निदान आठवड्यातून एक दिवस तरी आपल्या आपल्या आईवडीलांना द्यावा.
२.लग्न झाल्यानंतर घर खर्चासाठी त्यांच्या तोंडावर पैसे फेकू नये.वेगळं राहून जुन्या घरातली बिल भरता येतात.
३.वेगळं राहण्याची कुवत असेल तर वाटणीच्या वेळी हक्क घ्यायला जाऊ नये. किंवा वाटणी होऊ देऊ नये त्यांचा पैसा त्यांच्या कडेच ठेवावा किंवा जो मुलगा जवाबदारी घेईल त्याच्याकडे द्यावा.मग जवाबदारी घ्यायसाठी सर्व धावून येतील.
४.तिनं भाऊ असतील तर आपल्या आईवडीलांबरोबर क्येच क्येच तरी खेळू नये. निदान माझ्या घरी तरी मी असच म्हणतो.
५.लग्नाचा खर्च आणि दागिने आईवडीलाने द्यायचे आणि मुलांनी वेगळं राहायचं.लग्नाची बायको सुधा आईवडीलांनी शोधून द्यायची नंतर वेगळं राहून हे लोक आपल्या आईवडीलांना आपला सुखी संसार दाखवणार हे पटत नाही.
६. किती मूल मुली असतील जी लग्नाअगोदर आईवडीलांसाठी खरंच काही करतील.वयाच्या २५व्या वर्षापासून लग्नाची बचत लग्नाच्या खर्चाचा हिशोब मांडला जातो.त्यानंतर मुलाच्या शिक्षणाचा त्यात आईवडीलांसाठी काही तरतूद किंवा बचत असण्याची शक्यताच नाही.
७.आईवडीलांना जुनं घर का ? त्यांना नवीनं घर द्या आणि स्वतः जुन्या घरात राहा. जमेल का अस करायला ?
८. लग्नाच्या बाबतीत मुलीचा राग येतो कारण आईचे दागदागिने लग्नाचा खर्च तिने आपल्या आईवडीलांवर लादावा आणि लग्न झाल्यावर कधी घरी आली की आईवडीलाने भरभरून गोष्टी सासरी घेऊन जाण्यास द्यावा. यात लग्नाअगोदर आणि लग्नानंतर आपल्या आईवडीलांसाठी करणाऱ्या मुलींची उदाहरण निदान माझ्या कंपूंत तरी दोनच आहेत.आता त्यात मुलगा वेगळं राहून मुलाची हि भर पडते आहे.
असो इच्छा असेल तर भरपूर काही करता येत आणि नसेल तर भरपूर काही त्यांच्याकडून हिसकावता येत.