गमभनच्या ७.०५.०५ या नव्या आवृत्तीमध्ये पुढील बदल केले आहेत -
१) फाफॉ + विंडोज् / लिनक्स यात .h तसेच .n वापरल्यावर अनुक्रमे हलन्त आणि अनुस्वार उमटत नसे. आता ही त्रुटी दूर केली आहे.
२) gamabhanaphoneticmaps.js या पुस्तिकेचे आकारमान १६.८ कि.बा. वरून ३.२३ कि.बा. करण्यात यश मिळाले आहे.
३) क़ ख़ ग़ ज़ फ़ ड़ ढ़ य़ या वर्णांचा बाराखडीमध्ये समावेश केला आहे.
४) नुक्ता वापरण्याकरता .q ची सोय केली आहे.
नवे बदल इथे आहेत.
घरबसल्या वापरकारता बदल इथून उतरवून घ्यावेत.
गमभन टंकलेखन सुविधेच्या विकासाचा गेल्या वर्षभराचा आढावा इथे उपलब्ध आहे.