माझ्याही मनात अशीच शंका आली होती.तीवर मी माझे समाधान असे करून घेतले.
अकाली मरण पावणारा /री /रे एकतर अपघातात मरतो किंवा असाध्य रोगाने ! अपघात झाल्यावर शरीराची जी अवस्था होते ती फाटलेल्या कपड्यासारखी असते त्यामुळे तो नवा असला तरी शिवून वापरावा लागतो ( कधी कधी शस्त्रक्रिया करून मनुष्य वाचतो) किंवा मग फेकूनच द्यावा लागतो ( मरण) असाध्य रोग झालेले शरीर तरुण माणसाचे किंवा लहान मुलाचे असले तरी ते जीर्णच !
अर्थात माझे स्पष्टीकरण बरोबरच असेल असे माझे म्हणणे नाही.