निनाद,
घर घेण्याबद्दलच्या माझ्या प्रयत्नांना तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद पण कृपया माझ्या या स्वार्थी प्रयत्नांची तुमच्या बहिणीच्या प्रामाणिक प्रयत्नांशी तुलना करू नका.
माझे आईबाबा अगदी छानपैकी सेटल्ड आहेत आणि माझी भावंडंदेखिल. मी कामानिमित्त इथे त्यांच्यापासून दूर रहायला आलेय खरी पण अर्धा जीव कायम त्यांच्यापाशीच घुटमळत असल्यागत वाटतं आणि हीच परिस्थिती त्यांचीही होते माझ्याबद्दल विचार करताना. या सर्व काळज्यांमधून माझी आणि त्यांचीही सुटका व्हावी म्हणून मला ते माझ्यासोबत रहायला हवे आहेत आणि म्हणून माझ्या कार्यक्षेत्री मी मस्त प्रशस्त घर घेणार आहे ज्यात ते एकदम आरामशीर राहू शकतील माझ्यासोबत ( आणि माझ्या समविचारी नवरा मिळाल्यास तो आणि त्याच्या ( आणि अर्थातच मग माझ्याही ) आईबाबांसोबत ). तसं पहायला जाता आम्हाला एकमेकांच्या पैशासंपत्तीची कवडीमात्र गरज नाही आणि ती कुठेही गेली तरी मला पर्वा नाही. हो.. पण मला त्यांची सोबत मात्र हवीच हवी आहे. माझ्याकडे असलेली एकमेव अनोखी इस्टेट - माझे आईबाबा - ते शक्य तितके जास्त - खरंतर कायमच माझ्यासोबत असावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि म्हणून हा सगळा खटाटोप.. पूर्णतया स्वार्थी ! हा तद्दन स्वार्थीपणा तडीस न्यायला खुद्द माझ्या आईबाबांपासून सगळेचजणं विरोधात आहेत ! एक अनोखा डाव आहे हा ज्यात इथूनतिथून सग्गळं माझ्या विरोधात असूनही मनांमध्ये शिरून त्या सग्गळ्या मनांवर राज्य करायचंय मला - जे मी लवकरच करणार आईबाबांच्या आशिर्वादाने.
सर्व आईवडिलांना माझ्यासारखी मुलंमुली द्यावेत याबद्दल माझी अजिबात संमती नाही ( कारण मी खूप पिडलंय/तेय/णार माझ्या आईबाबांना ) पण सर्व मुलांचे माझ्या आईबाबांसारखे असावेत असं मात्र मनापासून वाटतं.
वेदश्री.