आपण भ्रष्टाचार नाइलाजाने करतो वा सहन करतो हे सत्य आहे. केवाकानी उदाहरण दिले तसे मीही वागलो आहे म्हणजे घर बांधण्याच्यावेळी बऱ्याच तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते त्यासाठी मी शांतपणे वाट पाहिली पण पैसे दिले नाहीत.कारण मला घाई नव्हती.मात्र माझ्या मुलाला पसदेशी जावे लागले त्यावेळी त्याला वेळ फार कमी असल्याने पासपोर्टसाठी पोलिस तपासणीसाठी पैसे देऊ नकोस असे मला सांगणे शक्य झाले नाही कारण त्याला १५ दिवसात निघायचे होते आणि पोलिस त्यांच्या टेबलावर ठेवलेल्या गठ्ठ्याकडे बोट दाखवून साहेब तुमचा नंबर सहा महिन्याने येईल ,कारण आम्हाला एवढ्या केसेस तुमच्या अगोदर पूर्ण करायच्या आहेत असे स्पष्टपणे सांगत होते आणि त्याचा अर्थ उघड  होता. वाहन परवाना घेण्याची तशीच कथा असते,तुम्ही कितीही व्यवस्थित गाडी चालवली तरी तुम्हाला दोनदा तरी परत पाठवले जाते अशा वेळी एजंटला गाठणे पर्यायाने भ्रष्टाचार करणे आलेच.याबाबतीत श्री.देवदत्त दाभोळकर यांचा अनुभव त्यांच्या दिल्लीतील सदनिकेविषयी त्यानी अंतर्नाद मासिकात उल्लेखला आहे.तो वाचण्यासारखा आहे.