श्री. कुशाग्र यांस सप्रेम नमस्कार.
आपण माझ्या पत्राला उत्तर दिलेत त्याबद्दल आभारी आहे. व्यक्ती आजारी पडते, किंवा एकाद्या अपघातात स्वर्गवासी होते त्या वेळी त्या शरीराला त्या शरीराचा आत्मा सोडून जातो, अर्थात उलटे म्हटले पाहीजे. त्या शरीराचा आत्मा त्या शरीराला सोडून जातो, आणि तो तरूण स्वर्गवासी होतो, हे मान्य केले तरी, २५ वर्षांचा तरणाबांड तरूण एकाएकी मरण पावतो, त्यावेळी तो खरोखरच मेला आहे कां झोपला आहे हेंही समजत नाही. मग अशा वेळी त्या आत्म्याला ते शरीर सोडून जावयाचे कारण काय?
गुरुजी