असे मलाही वाटते.
काही स्वेच्छेने भ्रष्टाचार करण्याची उदाहरणे -
१. आपण कित्येक वेळा जिने चढणे टाळण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडतो (म्हणजे आता मी स्वत: जिने चढतो, पण पूर्वी कित्येक वेळा रूळ ओलांडले आहेत).
२. ९०% हून अधिक लोक अन्यस्रोतौत्पन्न (इंकम फ़्रॉम अदर सोर्सेस) हे आपल्या आयकरविवरणपत्रात दाखवणे टाळतात आणि त्यावरचा करही भरत नाहीत (मी भरतो).
३. बहुतेक लोक खोटी वैद्यकीय बिले देतात (मीही). किती कमी कर भरणे टाळण्यासाठी कितीपत रकमेचा आपण भ्रष्टाचार करतो ते पहा.
४. जिथेतिथे लाच देण्याला आपण सदैव तयार असतो, पण क्वचित एखादी सेवा उशीरा/यथावकाश मिळालेली आपल्याला चालत नाही. रांगेत घुसणाऱ्याला किमान आक्षेप घ्यायलाही आपले तोंड उघडत नाही, तो काय आपल्याला मारणार असतो? (आपण गृहीतच धरून चालतो की आपण व्यक्तिश: काहीही करू शकत नाही.)
५. जिथे खपून जाते तिथे आपण सिग्नल तोडायला तयार असतो. एखाद्या ठिकाणी वाहतूक नसली व पोलीस नसला की आपण लाल सिग्नलकडे दुर्लक्ष करून पुढे जातो.
६. आपल्याला चुकून कोणाकडून जास्त मोड मिळाली की ९०% लोक ती आनंदाने स्वीकारून पुढे जातात.
वरील सर्व ठिकाणी आपण स्वेच्छेने भ्रष्ट होतो, हतबलतेने नव्हे.
याचे समर्थन कोणत्याही सबबीवर करणे योग्य नाही.
- दिगम्भा