कर्मविपाक सिद्धांत ही जीवाची मोक्षाकडे जाण्याची पहिली पायरी समजू या. म्हणजे चांगले कर्म केले चांगले फळ मिळणार. अशी जीवाची धारणा होत जाते. अर्थातच यात फारसे तथ्य नाही.
त्यानंतरची पायरी म्हणजे कर्म तर करावे पण त्याच्या फळाचा त्याग करायला हवा. दुसरे म्हणजे जे काही अप्रिय सहन करावे लागेल ते भोग म्हणून समजायचे.
हळूहळू या पायरीतून बाहेर आल्यानंतर कर्म करण्याचा अहंकार निघत जातो. मग हळूहळू इतर जीवमात्राबद्दल आणि आपल्यामध्ये असलेल्या चैतन्य तत्त्वाचा भाव मनात प्रगट होत जातो.
यानंतरचे मात्र म्हणजे आत्मसाक्षात्कार हा कोणा ज्ञानी माणसाकडूनच समजून घेण्याचा मार्ग आहे हे मात्र नक्की.
द्वारकानाथ कलंत्री.
टीप : गीतेच्या एकंदरतीच मांडणी कधी कधी भल्यांभल्यांना गोंधळ होतो म्हणूनच जाणकार माणसाच्या मार्गदर्शनाची प्रार्थना केली पाहिजे असे मला वाटते.