"बिवली, केतकी, करंबवणे ही गावंच्या गावं केतकरांच्या मालकीची होती. केतकरच त्या परिसराचे राजे होते म्हणा ना!
त्या वेळी केतकरांची तीन घरं होती. तिन्ही गावात एकेक घर."
आणि असेच संदर्भ आहेत केतकी गावाचे.
शिवाय अजून एक विशेष उल्लेखनीय गोष्ट आधी लिहायची विसरलो. खूनखटल्यातल्या एका आरोपीचा नातू केतकरवहिनींच्या कडे वसतीगृहात रहायचा. त्यांचे घर भूकंपात गेले तेव्हा केतकरवहिनींनी त्या कुटुंबाला (इतर कुटुंबांबरोबर) घर बांधायला जागा दिली. ते प्रकरण शेवटी केतकरवहिनींच्या अंगाशी आले!
सर्व मंडळींचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद.