कुशाग्र :-

वैचारिक अपरिपक्वता : मी प्रेम करून जे विवाह करण्यास असमर्थ ठरले त्यांची उदाहरण दिली कारणांसहित. प्रेम करून विवाह केले आणि ते सुखी आहेत अशी माझ्याकडे ही उदाहरण आहेत पण जे प्रेम करून विवाह करू शकले नाहीत त्यांचं काय ? प्रेम आणि विवाह यात भरपूर अंतर ( वर्ष ) असतात त्यात बऱ्याच गोष्टी घडतात.

प्रेम करून विवाह होऊन सुखी आहेत हा एकतर्फी विचार वाटतो.

विकी :-

जे प्रेम कुतूहल म्हणून करतात ते स्वतःला किंवा जोडीदाराला प्रेमभंगाचा अनुभव देतात हा माझा दुष्टिकोन आहे त्यामुळे हा प्रश्न मला न विचारलेलाच बरा.

सुमीत :-

दोन्ही लेख लिहिताना भरपूर चुका केल्या सहमत.

विवेक साहेब :-

अग्दिच बालिश, बाल सहित्यसाठि वेगळा विभाग ठेवला तर बर होइल नाहि?

अस लिहायच आहे का तुम्हाला ?

अगदीच बालिश, बाल साहित्यासाठी वेगळा विभाग ठेवला तर बरं होईल नाही?

तर मी याला मूठभर लोकांची मक्तेदारी म्हणेन. बाल साहित्यासाठी वेगळा विभाग कशाला त्यांना घेऊच नका ना मनोगतीमध्ये.प्रशासकांकडून तरी असा नियम आढळला नाही किंवा माझ्या वयाच्या मुलांना लेख लिहिण्यास मनाई आहे अस आढळलं हि नाही. हि तुमच्या सारख्यांचीच मक्तेदारी बघायला मिळेल कधी मराठी नीट लिहीत नाही म्हणून डिवचायचं तर कधी लेख उत्तम लिहिला नाही म्हणून डिवचायचं.दोन वर्षा अगोदर तुटक तुटक इंग्रजी बोलताना आणि लिहिताना हि मला कोणी इतकं डिवचलं नसेल. दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा जरा आत्मपरीक्षण करू शकला तरी पुष्कळ.

मी हा भेद अजून पर्यंत केला नव्हता पण पुरे आता.असो तुमच्या अवलोकनात ४ आठवडे आणी ७ तास झालेले बघायला मिळाले आणि वाटचाली तर एक हि लेख वाचायला मिळाला नाही तरी हे टोमणे याच आश्चर्य वाटलं. मराठीत नीट एक वाक्य हि लिहू न शकता माझ्या पूर्ण लेखावरच असा उपदेश हे दुसरं आश्चर्य.मनोगतमध्ये तुम्ही जरा शुद्धिचिकित्सकाचा वापर करावा आणि मराठीच्या जोपासनेत, संवर्धनात मोलाची भर घालावी.तेवढं पुरेसं होईल. लहान मुलांनी तुमच्या सारख्यांना एवढा शहाणपणा शिकवण गरजेच नाही याची नोंद घ्यावी.