१.प्रेमाची परिणिती विवाहात झाली तरच ते प्रेम यशस्वी झाले असे म्हणता येईल का? किंबहुना, प्रेम हे शेवटी विवाहात रूपांतरित व्हायलाच हवे का?
होय. नाहीतर ते एकतर्फीच ठरेल.प्रियकर आणि प्रेयसी दोघ हि एकमेकांवर प्रेम करत असेल तर त्यांचा विवाह झालाच पाहिजे.
२.विवाह न करता दोन व्यक्ती एकमेकांवर कायम प्रेम करीत राहू शकणार नाहीत का?
पूर्वी हा प्रकार बघायला मिळायचा पण सध्या बघायला मिळणार नाही कारण पूर्वी वेगळं होण्यासाठी कारणे हि तशी वेगळीच होती. सध्या वेगळं होण्यासाठी कारणे घडवून आणलेली वाटतात.विवाह न करता दोन नाही एकच व्यक्ती प्रेम करत राहतो मग तो प्रियकर असो किंवा प्रेयसी.दुसरा वेगळा एखादा जोडीदार शोधून खूश राहण्याचा प्रयत्न करतो. सध्या वेगळं होण्यासाठी असमाधानी व्यक्ती भरपूर दिसतील किंवा आपल्याला हवा तो हा जोडीदार नाही हे कळल्यावर वाटेल ती कारणे देऊन वेगळं व्हायचं आणि आपल्या जोडीदाराला त्याची किंमत मोजायला लावायची.निदान माझ्या कंपूमध्ये तरी अशीच उदाहरण आहेत. वेगळं व्हायचंच होत तर एकत्र कशाला येतात फक्त प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी का इच्छा पूर्णं करण्यासाठी ? स्वतःच्या प्रियकर प्रेयसीला लग्नाअगोदरच असमर्थ ठरवायचं हे कसलं प्रेम ? भविष्याची गरज ओळखून बदललेलं प्रेम की उशीरा सुचलेलं शहाणपण.याची किंमत आपण दुसऱ्या जोडीदाराला मोजायला लावतो नाहीतर काही जणांनी तर ठरलेली लग्न लग्न मंडपातच मोडली आहेत अगोदर कोणावर प्रेम आहे अस कळल्यावर. म्हणून वाटत विवाह न करता दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत राहिल्या तर त्याचा काहीच फायदा नाही आणि काहीच उपयोग नाही. त्यासाठी त्यांचा विवाह होणे गरजेचे आहे.