वरचं वाचलं. कोणीतरी सर्व उदाहरणांमधे परिपक्वतेचा अभाव हे कारण आहे असं म्हणालंय. त्यांच्याशी मी सहमत आहे.

>>होय. नाहीतर ते एकतर्फीच ठरेल.प्रियकर आणि प्रेयसी दोघ हि एकमेकांवर प्रेम करत असेल तर त्यांचा विवाह झालाच पाहिजे.<<

निनाद, हा आदर्शवाद झाला. १६-१७ व्या वर्षी प्रेमात पडणं हे आयुष्यभर निभावण्यासाठी पुरतंच असं नाही. वय आणि अनुभवातून प्रेमाचे इतके नवीन नवीन पैलू समोर येत असतात. की रोमिओ-ज्युलिएट छापाचं प्रेम हेच केवळ एकमेव प्रेम नाही हे आपलं आपण जाणवायला लागतं. पण तुला दोष देत नाही. तुझं वय २२-२३ असावं (असं वरच्या लेखात वाटतंय) आणि त्या वयात मुलग्यांमधे हा रोमँटीसिझम (रोमान्स या अर्थी नाही) असतोच. विवाह आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकत्र असतातच किंवा नसतातच असे आडाखे आपण बांधू शकत नाही. त्यामुळे प्रेम यशस्वी ठरण्यासाठी विवाह झालाच पाहिजे हे मत काही पटत नाही.

ता.क. माझा प्रेमविवाहच आहे. अनेक अडचणी असल्या तरी आम्हाला निर्णयाचा पश्चात्ताप झालेला नाही. लग्नाला फक्त ५ च वर्षे झाली असल्याने लग्न यशस्वी म्हणणे सयुक्तिक नाही पण आमच्या नात्याला आता १० वर्षे झाली असल्याने प्रेम यशस्वी म्हणायला हरकत नाही. :)