गज़ल आवडली. युद्धाचा आणि वडाचे शेर छान.
साशंक ऐकले मी आदेश प्रेषिताचे
हेतू खरा तयाचा अवगुंठनात आहे
ह्या शेरात रदीफ वेगळा आहे. नजरचुकीने झाले असावे.
असूरजात होता असा शब्दप्रयोग कानाला खटकतो आहे. प्राणीजात तसे असूरजात केले आहे का? असूरजातीचा अपेक्षित होते..असे आणखी शब्दप्रयोग वाचले आहेत का? उदा दिले तर खुलासा होईल.
वडाचा शेर सुरेख आहे. रोपं हे अनेकवचन जरी आहे तरी शेवटचे अक्षर, 'अकार 'लांबवला नाही तर उच्चारात लघू वाटते, वृत्तपूर्ती होते आहे तरीही हे टाळावे.
युद्धास अंत नसतो, इतिहास साक्ष आहे असा बदल केला तर?
जे पुण्य जोडले मी त्याच्याच जर कृपेने
ह्या ओळीत अधिक सफाई येऊ शकेल , थोडा फेरफार करून पहावा.