विविध मराठी संकेतस्थळांवर एक-दोन ओळींचे चर्चाप्रस्ताव लिहिणे (हेच चांगले खरे म्हणजे, जास्त लिहिल्यावर कुणालाही ते काय लिहिले आहे, ते कळेनासे होते तरीही) 'हे असे एका ओळीचा निबंध तुम्ही लिहा आणि आम्हाला सविस्तर प्रतिसाद लिहायला सांगा..' असे एकजात सर्व सभासदांकडून ओरडून घेणे, अंगाशी आल्यावर 'मला इंग्रजी शिकवाल का कुणी, मी चौथी इयत्ता पास आहे फक्त' असा कांगावा करणे, 'मला फक्त मराठीच येते, तेव्हा तेव्हढ्याच भांडवलावर मी रोजगार शोधतोय' असे जाहीर करणे, नंदकिशोरांचा प्रतिसाद (बहुधा ghost writer  ने लिहिलेला) आला की टाळ्या पिटणे,  माधवकाकांच्या नावाने शंख करणे, मराठीतून विज्ञानाची पुस्तके कुठे मिळतील ह्याची चौकशी करणे.....

....... ह्या सर्व उचापत्यांतून जर वेळ मिळाला, तर सुंदर मुलींच्या मागे कसे जावयाचे, ह्याची निरर्थक चौकशी करणे, व उत्तर न मिळाल्याने, ज्याला हा प्रश्न विचारला होता, त्याच्या मूळ लेखावरच घाव घालणे.....

एकूण काय, वेळच वेळ....