जीवन जिज्ञासा,
सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल आभार.

साशंक ऐकले मी आदेश प्रेषिताचे

हेतू खरा तयाचा अवगुंठनात आहे
ह्या शेरात रदीफ वेगळा आहे. नजरचुकीने झाले असावे.
 - हो, नजरचुकीनेच झालं. "सुपूर्त करण्याआधी वाचून पहा" ह्या प्रशासकांच्या वैधानिक इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम.

असूरजात होता असा शब्दप्रयोग कानाला खटकतो आहे. प्राणीजात तसे असूरजात केले आहे का? असूरजातीचा अपेक्षित होते..असे आणखी शब्दप्रयोग वाचले आहेत का? उदा दिले तर खुलासा होईल.
 - उदा. 'दैवजात'.  'असुरजात' मधील 'जा ' चा उच्चार जादू, जानकी या शब्दांतील 'जा' सारखा करावा. इथे असुरांनी जन्म दिलेला, राक्षसकुळात जन्मलेला असा अर्थ घ्यावा. ब्राह्मण,क्षत्रीय इत्यादी ह्या अर्थाने 'जात' नाही.

युद्धास अंत नसतो, इतिहास साक्ष आहे असा बदल केला तर?
- बदल चांगला आहे.

जे पुण्य जोडले मी त्याच्याच जर कृपेने
 ह्या ओळीत अधिक सफाई येऊ शकेल , थोडा फेरफार करून पहावा.
- मान्य. प्रयत्न करतो.