१) पहिल प्रेम आणि विवाहापर्यंतची यशस्वी वाटचाल आहे
२) प्रेम करताना होणारी भांडणे.
३)प्रियकर प्रेयसी चे तीन प्रकार.
४) एका इमारततीत घडलेली घटना. प्रियकराची आत्महत्या ,प्रेयसी जास्त कोणाशीही बोलत नाही.
५) लेखकाचा झालेला प्रेमभंग. त्याचे सिगारेटी फुंकणे.
६) वाचनाची आवड ,प्रविण दवणेंची पुस्तके वाचुन परिवर्तन.
७) लगेच भेटलेली दुसरी प्रेयसी. दोघांच्याही घरातुन होकार.
८) मित्राची प्रेयसी तिचा लग्न करण्यासाठी हट्ट ,त्या दोघांची वये. मित्राचे फालतु कारण देणे मुलीला मंगळ ,मुलाने आई कस समजावयाचे.
९) मुलिचे लग्न , मुलगा करीयरच्या मागे.
१०) लेखकाने या लेखातुन दिलेला बोध ,प्रियकर प्रेयसीचे अभिनंदन.
वरील घटना क्रमाने घडत गेल्यात. त्यांचा घटनाक्रम लिहीलेला आहे.
लेखाचा विषय- प्रेम आणि विवाह या लेखातील प्रेम त्यानंतर होणारा विवाह या बद्दल लेखकाने लिहीलेले आहे. पहिल प्रेम ते विवाहापर्यंतची यशस्वी वाटचाल त्यानंतर होणारी भांडणे याबद्दल त्याने खोलात न जाता सांगितले आहे. सुज्ञ वाचक ते समजुन घेतील असे लेखकाला वाटत असले पाहीजे. मध्येच येणारे लेखकाने पाहीलेले प्रियकर आणि प्रेयसी तीन प्रकार. यातही त्याने खोलवर न शिरता सांगायचा प्रयत्न केला आहे.त्यानंतर होणारे एकामागोमाग घडत जाणारे प्रसंग लेखाकाने टिपले आहे.
अंतर्मनातील चित्रण- लेख प्रेमी युगुलांतिल मनोविश्वातील अंतरांचे दर्शन घडवणारा आहे. लेख आजच्या युगावर भाष्य करतो. पहील्या प्रेम कसे होते मन कसे चलबिचल होते त्या प्रेमाची कळतनकळत विवाहापर्यंत वाटचाल कशी होते. लग्न झाल्यावर होणारी भांडणे .नंतर भांडणात स्वतःला गमवणारे प्रियकर प्रेयसी, एकामेकांना गमवुन पुन्हा एकत्र येणे,लग्नासाठी हट्ट धरणारी प्रेयसी या तीन प्रकारात लेखाकाने प्रियकर प्रेयसी चे भावविश्व रेखाटले आहे. प्रेमातील विरह विरहानंतर भेटण्याची ओढ, प्रियकर आपल्याला सोडून तर जाणार नाही अशी प्रेयसी वाटलेली भीती लेखकाने उभी केली आहे.
नंतर लेखाचा सुरू होणारा दुसरा भाग यात प्रियकराने केलेली आत्महत्या याबाबत लिहीलेले आहे त्या प्रियकराचे प्रेयसीच्या वडीलांना भेटणे तिच्या वडीलांचे तयार होणे आणि त्यात वेळी त्याने तुमची मुलगी माझ्याबरोबर बंद खोलीत होती असे तिच्या वडीलांना सांगणे तेव्हा ताबडतोब त्याला घरातुन हाकलुन देणे व तिचे त्याच्याशी बोलणे बंद करून तिच्यावर निर्बंध घालणे प्रेयसीच्या भेटण्यास आतुर झालेला तो प्रियकर त्याच्या आगाऊपणामुळे कसा फसला तिचा विरह सहन न होऊन त्याने केलेली आत्महत्या, त्याची झालेली स्थिती .प्रेयसी च्या मनातील घुसमट लेखकाने टिपली आहे.
यानंतर लेखकाने त्याच्या महाविधालयीन विश्वात त्याचा झालेला प्रेमभंग लिहीलेला आहे त्याचा प्रेमविवाहासाठी हट्ट मुलीच्या घरी प्रेमविवाहाला मान्यता नाही यातुन तिच्या घरातील बंदीस्त मनोवृत्तीचे चित्रण लेखकाने उभे केले आहे. प्रेयसीची निर्णय घेण्याची क्षमता त्यातुन लेखकावर आलेला मानसिक ताण,त्यातुन त्याला जडलेले व्यसन नंतर त्याने केलेल्या महाविधालयीन विश्वातील भानगडी. नंतर त्याच्यात पुस्तके वाचनाने झालेला बदल लगेच त्याला भेटणारी दुसरी प्रेयसी दोघांच्या घरातून मिळालेली परवानगी यातुन लेखकाने त्याच्या व तिच्या घरातील मोकळेपणाबद्दल सांगितले आहे.
यानतर लेखकाचा मित्र व त्याची प्रेयसी तिचा लग्नाचा हट्ट .त्याची टाळाटाळ ,आईला कसे सांगणार वैगेरे वैगेरे तिला असणारा मंगळ यातुन लेखकाने त्याच्या घरातिल अंधश्रद्धेबाबत सांगितले आहे.
या लेखातुन लेखकाने दिलेला संदेश व सर्व अडीअडचणींवर मात करून शेवटी प्रियकर प्रेयसी चे केलेले अभिनंदन .
या असल्या लेखावर टिका करायची मनापासुन खुप म्हणजे खुपच इच्छा आहे पण बऱ्याच जणांना हा लेख खुपच आवडल्याने व मी बहुमताचा आदर करणारा असल्याने ,माझा वकिल(बाजू घेणारा) नसल्याने मी टिका करू शकत नाही. त्याबद्दल माफ करावे.
आपला
कॉ.विकि