मराठी माझी मात्रुभाषा आहे.
पण का ?
मी मराठी घरात जन्मलो म्हणुन की मी लहानपणापासुन मराठी बोलतोय म्हणुन.
माझे आई वडील मराठी बोलतात म्हणुन की शाळेत मराठी माझी प्रथम भाषा होती म्हणुन.
मी जर लहानपणापासुन परदेशी राहीलो असतो तरी माझी मात्रुभाषा मराठीच राहीली असती का ?
मला मराठी भाषेचा गंधही नसता तर केवळ माझे पूर्वज मराठी होते म्हणुन मराठी माझी मात्रुभाषा झाली असती,
भलेही मग मी मराठीत कितीही का ढ असेना.
अशा भाषीक लोकाना कुठल्या गटात मोजायचे ?
माझी मात्रुभाषा मराठी आहे कारण मी मानतो म्हणुन , बाकी सगळे कारणे व्यर्थ.
जागतिकीकरण : म्हणतात जग़ जवळ आलय. मी जेव्हा घरीबसुन इंटरनेट वरुन रैल्वेचे आरक्षण करतो, तेव्हा माझी आरक्षणाची विनंती किती प्रांतातुन कुठे कुठे जात असेल कोण जाणे. तेव्हा भाषेचा विचार आपण करतो का ? खचीतच नाही. केंद्र सरकार मध्ये मराठी मंत्री असताना महाराष्ट्राचे कुठले भले झालेय तर आज आपण या चौकटीचा विचार करावा. बदल्त्य युगमध्ये आपण हे विसरायलाच हवे. मराठी पाउलाने जग पादाक्रांत करायची मनीषा बाळगायलाच हवी पण हाही विचार करावा की ती मनीषा कशाने पूर्ण होणार , मराठीचा उदो उदो करण्याने की डोळसपणे भाषाजपुन विकासाच्या वार्यावर स्वार होण्याने.
"world is flat ,and is a better option, then why not make it our own way"
मराठी अवश्य शिकावी पण सोबतच इंन्ग्रजीमध्ये प्राविण्य मिळवायलाच हवे. प्रांताच्य सीमेसाठी भांडण्यापेक्षा विजेचा प्रश्न सोडवणे जास्त गरजेचे आहे, वाढत्या रहदारीवर , पाणी प्रश्नावर चर्चा होणे जास्त मह्त्वचे आहे. कुणामुळे काय झाले यापेक्षा होणे महत्त्वाचे आही. हे प्रश्न सुटलेत की खुशाल मराठीवर चर्चा व्हावी, भाषावार प्रांतरचनेवर उहापोह व्हावा.
"No offence Intended"