बहूत खूब, केश्या!! मूळ गझलेहून विडंबन श्रेष्ठ.

प्रेमास अंत असतो, इतिहास साक्ष आहे
अंकुर समरबिजाचा शुभमंगलात होता
 - चिरंतन सत्य.

आता बघा कसा तो आहे सरावलेला
पहिल्याच फक्त वेळी तो संभ्रमात होता
 - हा हा हा.

भार्यालय शब्द झकास.

अद्दल "केशवा"ला जन्मात या घडू दे
धावा कवीजनांचा एका सुरात होता
 - जरा जपून. केवाकाताईंनी इथे बंडाचे निशाण फडकवलेच आहे.