सचिनराव, पुण्यात राहून विदर्भाचा विचार करणे सोपे. पण एकदा विदर्भात जाऊन बघा, खरी परिस्थिति भयाण आहे.
लोड-शेडींग सर्व ठिकाणी आहे, पण चौदा-अठरा तास लोड-शेडींग पुण्यात केल्यास काय होईल याचा विचार करा, मग विदर्भाचं दु:ख कळेल.
विदर्भातील एक वीज-सयंत्र बंद पडु द्या, पुण्या-मुंबईची सगळी शान नाही गेली तर बघा.
ज्या विदर्भाच्या जीवावर पुणे-मुंबई मजा करतात, त्याच विदर्भाचा अनुशेष भरुन काढायला काय होत आहे? उशीर का?
नेते मंडळी पैसे खाणे आणि भाषणे देणे या व्यतिरिक्त काहिहि करित नाहीत.
लोक तर त्याहून आहेत. खरा शेतकरी राहीला बाजूला आणि बाकीचेच मलिदा खाण्यास तयार असतात.
नामर्द नेते मंडळीना निवडून देतात आणि मग आरडा-ओरडा करतात.
राव, विदर्भाचं दु:खणं विदर्भात नसून पुण्या-मुंबईत आहे, त्याचा इलाज शोधला पाहीजे.