याबाबतीत एक शंका आहे: आपल्याला आपल्या प्रारब्ध/क्रीयामाण अथवा संचिताचा हीशेब का सांगीतला जात नाही? टार्गेट नसेल तर काम कसे करायचे?

विटेकर, नमस्कार !
या ठिकाणी मला असे वाटते की हा सर्व हिशेब कोणी सांगावा? हा हिशेब सांगणारा त्रिकालज्ञानी पाहिजे तसेच तसा तो असेल तर तो प्रारब्धाच्या गणितात हस्तक्षेप करिल का ?!! ते असो.

तर मग प्राप्त परिस्थितीमध्ये काय करावे हा प्रश्न उरतोच. बहुधा ज्ञानेश्वर अशी उपमा देतात की मशालीच्या ज्वाळा जशा थोड्या वर जाउन हवेत विरतात तशी आपली कर्मे झाली पाहिजेत. म्हणजेच कर्म तर होत आहे पण ते फळ निर्माण करत नाहिये. ही स्थिती साधणे कला खरीच आणि त्याचेच विवरण गीतेत आहे असे वाटते. मग असा कर्मयोगी होणे हेच आपले टार्गेट असावे असे मला वाटते. त्या  योगे संचित आणि क्रियमाणाचा हिशेब न करता सुद्धा प्रवास करता येईल.

आपल्याला हे कसे वाटते?
-- (लेखनवीर) लिखाळ.