घडणाऱ्या घटना निंदनीय आहेत.
१) अश्या प्रकारच्या घटनांना मानाच्या मराठी वृत्तपत्रात स्थान दिले जात नाही. हिंदु-मुस्लिम दंगलीचे वृत्त ही वृत्तपत्रे छापत्तात पण दलितांवरिल अत्याचाराच्या बातम्या यांना दिसत नाहीत. दै. सम्राट,लोकनायक या वृत्तपत्रात तर रोजच दलित अत्याचाराच्या बातम्या छापुन येतात पण ही वृत्तपत्रे ठराविक वर्गच वाचतात.
२)२१ व्या शतकातही भारतीय समाजात अजुनही विषमता किती आहे हे दाखवण्यासाठी अश्या प्रकारच्या बातम्या छापणे गरजेचे आहे. नाहीतर वरील वृत्तपत्रे ठराविक समाजापुरतीच असल्याने त्या समाजातील लोकांची मने कलुषित होण्यास मदत होईल.
३) अश्या प्रकारच्या घटनांना प्रसिद्धी द्यावी समाजाचे चित्र डोळ्यांपुढे आणले पाहीजे . माध्यामांनी त्यासाठी जागरुक होणे गरजेचे आहे.
(विषयांतर आणि व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर वगळला. आपले लेखन वारंवार संपादित करण्याची वेळ येऊ नये ह्याकडे कृपया लक्ष द्यावे : प्रशासक)
आपला
कॉ.विकि