मनोजय महाराज,

तरूणांना प्रोत्साहन देताना आपल्याला दोन गोष्टींचा विसर पडलेला दिसतो.

पहिली ही, की ' त्यांना काहीही कळत नाही (सगळा शहाणपणा माझ्याकडेच एकटवला आहे)' [ पाहा: एका चर्चेच्या शेवटी आपली अशा अर्थाची बिनबुडाची शेरेबाजी] हा जरी खास पारंपरिक मराठी बाणा असला, तरी त्याच्यात स्पृहणीय असे काहीच नाही, उलट आनंदाने टाकून द्यावी अशी ती एक गोष्ट आहे. तेव्हा नवीन पिढीसमोर ह्याचंच प्रदर्शन कशाला?

दुसरी ही की 'कशाला गातात ते/ त्या, बंद केले पाहिजे त्यांनी गाणे' 'कशाला लिहितात ते? बंद केले पाहिजे त्यांनी लिहिणे' वगैरे अत्यंत बावळट assertions  आहेत. एक साधा उपाय असतो-- एखाद्याचे गाणी आवडत नसेल, तर ते न ऐकणे, एखादा लेख, चर्चा वगैरी काही वाचवत नसेल, तर ती न वाचणे. हे करायला अगदी सोपे. पण उगाच जाताजाता, आपण तरुण मनांची स्पंदने वगैरे काय जे असेल ते, कसे अगदी बरोब्बर ओळखतो, आपण तरूणांशी कसे identify  होतो, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना नसती शेरेबाजी कशाला? तरूणांना थोडीतरी विनयशील, अदबशीर वागणूक (humility)  दिसूद्या!