दोन्हीही भाग एकदमच वाचले. मजा आली वाचताना.ह. ह. पु.वा.   केवाका म्हणतात त्याप्रमाणे विनोदाचा वेगळाच ढंग वाचायला मिळाला. :-)) आणि अनुभव तर अगदी स्वत:चेच वाटले. मध्यरात्रीच काय पण सकाळी ८-९ वाजता असणाऱ्या मीटींगमधेही माझं असंच होतं.

"एक हात सोडून (आणी कधी कधी दोन्ही हात सोडून) दुचाकी चालवणाऱ्याच्या सफाईने मी मध्येच इकडेतिकडे बघणे, ध्वनीक्षेपकापासून तोंड बाजूला नेऊन जांभई हाणणे, कानाला लावलेले जंजाळ बाजूला करून अंक-उच्चामध्ये अंतर्भूत असलेल्या ध्वनीक्षेपकात बोलणे, ध्वनीक्षेपकावर हात ठेवून कॉफीचा मोठा घोट घेणे असे प्रकार सुरू केले." :-)))

पुढील भागाच्या प्रतीक्षेत. :-)

-अनामिका.