फायरफॉक्स न्याहाळकात अक्षरे तुटताहेत.

मजकूर मनोगतावर प्रसिद्ध करताना तो दोन्ही समासांना जुळवलेल्या मांडणीत (जस्टिफाय) असू नये. असा मजकूर दाखवताना शब्दांमध्ये सोडायची जागा न्याहाळकाला कमी जास्त करावी लागते. देवनागरी मजकुराच्या बाबातीत फक्त आय ई लाच (सध्या, आमच्या पाहण्यानुसार) हे निर्दोषपणे करता येते. इतर न्याहाळक हे करत असताना त्यांना देवनागरीतली जोडाक्षरे, मुळाक्षरे इत्यादींमध्ये होणारी रूपांतरे नीट उलगडत नाहीत आणि अक्षरे तुटतात.

मनोगतावर दोन्ही समासांना जुळवण्याचा पर्याय दिलेला नाही तो दुर्लक्षाने राहून गेलेला नसून तो वरील निरीक्षणामुळे सहेतुक टाळलेला आहे, हे कृपया ध्यानात घ्यावे.