आपले नियम आपणच बनवले पाहिजेत. डोळे झाकून इतरांचे अनुकरण करु नये. भारतातील जवळ जवळ सर्वच राजकारणी व्यक्तींचे फक्त एकच ध्येय आहे. निवडणूक जिंकून खुर्ची बळकावणे. त्यांची निष्ठा फक्त खुर्चिवर. कोठल्याही तत्त्वावर क्वचितच एखादा राजकारणी निष्ठा दाखवतो. मझ्या मते त्यावा तत्त्वनिष्ठ बनवण्याकरता ६ वर्षांचे सभासत्त्व अनिवार्य करणे आवश्यक आहे. कोठलीही निवडणूक लढवण्याकरता अर्ज भरण्याच्या दिवशी राजकारणी त्या आधीची सलग ६ वर्षे त्या पक्षाचा सभासद असला (ली) पाहिजे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असेल तर त्या आधीची सलग ६ वर्षे कोठल्याही पक्षाचा सभासद नसला (ली) पाहिजे. या मुळे पक्षश्रेठींचि अरेरावी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर कांहीतरी उपाय केला पाहिजे. कोणी उपाय सुचवेल?